सामर्थ्य सागराचे
या सागरात असती
मासे नाना प्रकारचे
हा प्रचंड जलसाठा
आहे सामर्थ्य सागराचे
मिळतात सागराला
येथे नदी आणि नाले
सागराच्या पोटात
सारेच सामावले
ढग तयार होती
सागराच्या पाण्याचे
हा प्रचंड जलसाठा
आहे सामर्थ्य सागराचे
वाळू आणि हे मीठ
शंख आणि शिंपले
अन्न म्हणून मासे
सागरातून मिळे
या सागराचे तळ
आगर इंधनाचे
हा प्रचंड जलसाठा
आहे सामर्थ्य सागराचे
2.7.2018
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
या सागरात असती
मासे नाना प्रकारचे
हा प्रचंड जलसाठा
आहे सामर्थ्य सागराचे
मिळतात सागराला
येथे नदी आणि नाले
सागराच्या पोटात
सारेच सामावले
ढग तयार होती
सागराच्या पाण्याचे
हा प्रचंड जलसाठा
आहे सामर्थ्य सागराचे
वाळू आणि हे मीठ
शंख आणि शिंपले
अन्न म्हणून मासे
सागरातून मिळे
या सागराचे तळ
आगर इंधनाचे
हा प्रचंड जलसाठा
आहे सामर्थ्य सागराचे
2.7.2018
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment