मी उनाड वारा
कधी कोणाला सुखावणारा
कधी कोणाला दुखावणारा
मी झुळूक वादळ वारा
मी उनाड वारा मी उनाड वारा !
कधी हळूच येवूनी प्रेमवीरांना सुखावतो
कधी मंद वाहूनी पहा कसा मी लहरतो
तुमच्या अंगावरती कसा आला हा शहारा
मी उनाड वारा मी उनाड वारा
कधी रानावनात मी जोराने वाहतो
घाबरतात प्राणी कधी झाडंही पाडतो
पाहून मला सारे आता शोधतात आसरा
मी उनाड वारा मी उनाड वारा
कधी मी सागरावर पहा कसा स्वार होतो
कधी छोट्या छोट्या लाटा कधी त्सुनामी मी होतो
पाहून अशा लाटा आता शोधतात किनारा
मी उनाड वारा मी उनाड वारा
हे ढग पहा कसे वाऱ्यावर झुलतात
इकडून तिकडे वाऱ्यानेच पळतात
पहा कशा ढगातून पडती जलधारा
मी उनाड वारा मी उनाड वारा
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
कधी कोणाला सुखावणारा
कधी कोणाला दुखावणारा
मी झुळूक वादळ वारा
मी उनाड वारा मी उनाड वारा !
कधी हळूच येवूनी प्रेमवीरांना सुखावतो
कधी मंद वाहूनी पहा कसा मी लहरतो
तुमच्या अंगावरती कसा आला हा शहारा
मी उनाड वारा मी उनाड वारा
कधी रानावनात मी जोराने वाहतो
घाबरतात प्राणी कधी झाडंही पाडतो
पाहून मला सारे आता शोधतात आसरा
मी उनाड वारा मी उनाड वारा
कधी मी सागरावर पहा कसा स्वार होतो
कधी छोट्या छोट्या लाटा कधी त्सुनामी मी होतो
पाहून अशा लाटा आता शोधतात किनारा
मी उनाड वारा मी उनाड वारा
हे ढग पहा कसे वाऱ्यावर झुलतात
इकडून तिकडे वाऱ्यानेच पळतात
पहा कशा ढगातून पडती जलधारा
मी उनाड वारा मी उनाड वारा
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment