स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

संध्यारेषा

संध्यारेषा

संध्यारेषेची ही आता वेळ झाली !
घराकडे सारे परत फिरली ! 

संध्यारेषेची रे लागता चाहूल !
मार्ग परतीचा धरती पाऊल !

संध्यारेषा बघा दिसता समोर !
खग आकाशात करती विहार !

संध्यारेषा आली सारे शांत झाले !
घरी बसलेले बाहेर निघाले !

संध्यारेषा गेली घरी नाही आले !
वाट पाहूनिया डोळे ओले झाले !

             :-     हरेशकुमार ना. खैरे
                    काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment