स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

शूर शिवबा

शूर शिवबा

शूर शिवबाने जन्म घेतला
शिवनेरी किल्ल्यावर
राज्य गाजविले तयाने
शत्रूंच्या मनावर.

आई जिजाईने शिवबावर
संस्कार असे केले
बालवयात शिवबाने
स्वराज्य स्थापन केले.

बलाढ्य शत्रू सभोवती
अफाट त्यांच्या फौजा
न डगमगणारा शिवबा
हिम्मतवान राजा.

औरंगजेबाने पहा
जंग जंग पछाडले
मोठमोठे सरदार
शिवबाने लोळवले.

शिवबाचे राज्य स्वराज्य
साऱ्या जाती धर्माचे
ध्येय त्यांच्या समोर होते
जनकल्याणाचे.

          17.02.2019
          हरेशकुमार ना. खैरे
          काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment