प्रत्यारोप
आरोप आणि प्रत्यारोप
सारेच फुसके होते
फसविण्या तुम्हा
ते धुळ फेकत होते.
रंगली जरी तयांची
ती जुगलबंदी होती
संगनमताने तुम्हा
लुटण्याची निती होती.
विरोध करण्याचा
तो दिखावा होता
मीच तुमचा वाली
हेच भासवत होता.
आरोप प्रत्यारोपांची
बरसात होत होती
येथे मात्र मतदारांची
गळचेपी होत होती.
कोण खरे कोण खोटे ?
ओळख पटत नव्हती
मुखवट्याच्या मागे
कोण लपली होती ?
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
आरोप आणि प्रत्यारोप
सारेच फुसके होते
फसविण्या तुम्हा
ते धुळ फेकत होते.
रंगली जरी तयांची
ती जुगलबंदी होती
संगनमताने तुम्हा
लुटण्याची निती होती.
विरोध करण्याचा
तो दिखावा होता
मीच तुमचा वाली
हेच भासवत होता.
आरोप प्रत्यारोपांची
बरसात होत होती
येथे मात्र मतदारांची
गळचेपी होत होती.
कोण खरे कोण खोटे ?
ओळख पटत नव्हती
मुखवट्याच्या मागे
कोण लपली होती ?
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment