स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

सुवर्णयोग

सुवर्णयोग 

सुवर्णयोग हा जुळून आला
बुद्धांचा येथे जन्म जाहला
स्वातंत्र्य समता देवूनी
बंधुभावाचा मार्ग दावला

सुवर्णयोग हा जुळून आला
शिवरायांचा जन्म जाहला
जीवन सारे अर्पण केले
स्वराज्याच्या कार्याला

सुवर्णयोग हा जुळून आला
जोतीरावांचा जन्म जाहला
जुनाट रूढी परंपरेवर
त्यांनी हल्लाबोल केला

सुवर्णयोग हा जुळून आला
सावित्रीचा जन्म जाहला
मुलींनाही शिक्षणाचा
आता अधिकार मिळाला

सुवर्णयोग हा जुळून आला
शाहूंचा येथे जन्म जाहला
दीन दुबळ्या जनतेसाठी
आरक्षणाचा जन्म जाहला

सुवर्णयोग हा जुळून आला
गाडगेबाबांचा जन्म जाहला
गावोगावी फिरून त्यांनी
स्वच्छतेचा मंत्र दिला.

सुवर्णयोग हा जुळून आला
तुकडोजीचा जन्म जाहला
ग्रामगीतेच्या उपदेशाने
गाव आपला मंदिर केला

सुवर्णयोग हा जुळून आला
भीमरावांचा जन्म जाहला
जाती, धर्मात विखुरलेला
समाज सारा एकत्र केला

                 श्री. हरेशकुमार ना. खैरे
                 काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment