मी पोशिंदा
आहे जगाचा मी पोशिंदा
धान्य पिकवणे माझा धंदा
तुमचे पोट भरता भरता
माझ्याच पोटाचा झाला वांदा.
रात्रंदिवस राबतो जरी
काबाडकष्ट ढोरांपरी
पिकांच्या रक्षणासाठी
कर्जाचा डोंगर माथ्यावरी.
करताना सारे थोडी आस
मिळेल सुखाचे दोन घास
तुमच्या सुखात माझं सुख
असते मनात हाच ध्यास.
विचार करा माझा थोडा
मी तर आहे साधाभोळा
द्या सुविधा आम्हा थोड्या
बनवू नका हो मला पांगळा.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
सदस्य मराठीचे शिलेदार समुह.
आहे जगाचा मी पोशिंदा
धान्य पिकवणे माझा धंदा
तुमचे पोट भरता भरता
माझ्याच पोटाचा झाला वांदा.
रात्रंदिवस राबतो जरी
काबाडकष्ट ढोरांपरी
पिकांच्या रक्षणासाठी
कर्जाचा डोंगर माथ्यावरी.
करताना सारे थोडी आस
मिळेल सुखाचे दोन घास
तुमच्या सुखात माझं सुख
असते मनात हाच ध्यास.
विचार करा माझा थोडा
मी तर आहे साधाभोळा
द्या सुविधा आम्हा थोड्या
बनवू नका हो मला पांगळा.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
सदस्य मराठीचे शिलेदार समुह.
No comments:
Post a Comment