स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

स्वप्नसुंदरी

स्वप्नसुंदरी

तू स्वप्नसुंदरी तू मनमोहिनी
मी भाळलो तुझ्यावरी
एकच विनंती आहे तुजला
भेटशील का एकदा तरी ?

स्वप्नात येऊन माझ्या
तू भुलविलेस मला
आतूर झालो मी असा
आता तुला भेटायला

तू जरी स्वप्नात दिसली
मज तुझाच होतो भास
तू माझ्या जीवनात
आता व्यक्ती झाली खास.

लोभस तुझे रूप
अन् चतुर तुझी नजर
देह तुझा पाहून माझ्या
उरात होते गजर.

तुच माझी स्वप्नसुंदरी
आहेस तुच माझी परी
होशील का तू सांग
जीवनात साथी खरी.

              :- हरेशकुमार ना. खैरे
                 काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment