स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

धागा जुळला मनाचा

धागा जुळला मनाचा

धागा जुळला मनाचा
धरती आणि आकाशाचा
वेध लागले धरेला
पावसाच्या मिलनाचा ।

धागा जुळला मनाचा
झाड आणि पक्ष्याचा
झाडालाही ओढ आता
पक्षी परत येण्याचा ।

धागा जुळला मनाचा
शेतकऱ्याचा शेताशी
पाहून डोलणारे पीक
तो बोलतो पिकाशी ।

धागा जुळला मनाचा
नदी आणि सागराचा
किनारी रंगला सोहळा
त्या दोघांच्या मिलनाचा ।

तसा तुझा आणि माझा
धागा जुळला मनाचा
नको रुसवा फुगवा
खेळ खेळू आनंदाचा ।

          हरेशकुमार ना. खैरे
          काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment