स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

वीरांगना

वीरांगना

वीरांगना पहा ती आली
उतरली रणांगणी
चौफेर चाले तलवार
थरथरली ही धरणी.
शौर्य पाहून तिचे
शत्रूला धडकी भरली
फौज पुढे न जाता
जागेवर थबकली.
पाहून विरांगनेला
सैन्यही लढले मस्त
शत्रू पळून गेले
झाला विजय जबरदस्त.
अशा कित्येक विरांगना
त्यांचा सन्मान करा
विरांगनांच्या पराक्रमाला
हा मानाचा मुजरा.

              23.6.2018
              हरेशकुमार ना. खैरे
              काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment