तेथे वसले होते गाव
जरी आता येथे
नाही कोणाचेच नाव
तरी म्हणे पूर्वी
तेथे वसले होते गाव.
जावूनशान शहरात
सुखानं राहावं
प्रत्येकाच्या मनात
होते हेच भाव
गाव सारं ओसाड
तेथे नाही कुणीच राव
तरी म्हणे पूर्वी
तेथे वसले होते गाव.
शहराकडं होती पहा
साऱ्यायचीच धाव
एकएक करून आता
खाली झालं गाव
नाही तेथे घरं आणि
नाही कोणाचा ठाव
तरी म्हणे पूर्वी
तेथे वसले होते गाव.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
जरी आता येथे
नाही कोणाचेच नाव
तरी म्हणे पूर्वी
तेथे वसले होते गाव.
जावूनशान शहरात
सुखानं राहावं
प्रत्येकाच्या मनात
होते हेच भाव
गाव सारं ओसाड
तेथे नाही कुणीच राव
तरी म्हणे पूर्वी
तेथे वसले होते गाव.
शहराकडं होती पहा
साऱ्यायचीच धाव
एकएक करून आता
खाली झालं गाव
नाही तेथे घरं आणि
नाही कोणाचा ठाव
तरी म्हणे पूर्वी
तेथे वसले होते गाव.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment