स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

पदोन्नती

पदोन्नती

आपल्या कामात।   करावी प्रगती।
मिळे पदोन्नती।   नक्की तुला  ।।

असू द्यावी सदा।   कामावर निष्ठा।
मिळेल प्रतिष्ठा।   प्रगतीने ।।

मनामध्ये ठेवा।   प्रगतीची आस।
मेहनत खास।    करा तुम्ही ।।

पदोन्नतीसाठी।  वशिला-फशिला।
लावावा कशाला।   अकारण ।।

पदोन्नती व्हावी।   ही इच्छा मनाची।
पावती कार्याची।  खरीखुरी ।।

पदोन्नतीने या।  जीवनात खुशी।
पिळू आता मीशी।  गर्वानेच ।।

             हरेशकुमार ना. खैरे
             काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment