स्वार्थ हा स्वत:चा
स्वार्थ हा स्वत:चा
कधी पाहिला मी नाही
सारे केले अर्पण
स्वत:साठी काही नाही !
जे जे होते माझे
ते साऱ्यांचेच होते
तुमच्याकडचे मात्र
कधीच माझे नव्हते
तुमचे मला मिळावे
असा मोह मला नाही
सारे केले अर्पण
स्वत:साठी काही नाही !
हे जंगल झाडेझुडे
देई फुले फळे
आदीमानव खाई
कसा कंदमुळे
या निसर्गाला तुम्ही
का जपत नाही
सारे केले अर्पण
स्वत:साठी काही नाही !
नद्या नाले निर्झर
पहा कसे वाहे
पोटामध्ये त्यांच्या
तुमचे जीवन आहे
पाण्याचे हे स्रोत
का स्वच्छ ठेवत नाही
सारे केले अर्पण
स्वत:साठी काही नाही !
राबतो हा शेतात
करतो अपार कष्ट
पोटभर ना जेवण
खाई कधी उष्ट
शेतकऱ्यांची चिंता
का कुणास वाटत नाही
सारे केले अर्पण
स्वत:साठी काही नाही !
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
स्वार्थ हा स्वत:चा
कधी पाहिला मी नाही
सारे केले अर्पण
स्वत:साठी काही नाही !
जे जे होते माझे
ते साऱ्यांचेच होते
तुमच्याकडचे मात्र
कधीच माझे नव्हते
तुमचे मला मिळावे
असा मोह मला नाही
सारे केले अर्पण
स्वत:साठी काही नाही !
हे जंगल झाडेझुडे
देई फुले फळे
आदीमानव खाई
कसा कंदमुळे
या निसर्गाला तुम्ही
का जपत नाही
सारे केले अर्पण
स्वत:साठी काही नाही !
नद्या नाले निर्झर
पहा कसे वाहे
पोटामध्ये त्यांच्या
तुमचे जीवन आहे
पाण्याचे हे स्रोत
का स्वच्छ ठेवत नाही
सारे केले अर्पण
स्वत:साठी काही नाही !
राबतो हा शेतात
करतो अपार कष्ट
पोटभर ना जेवण
खाई कधी उष्ट
शेतकऱ्यांची चिंता
का कुणास वाटत नाही
सारे केले अर्पण
स्वत:साठी काही नाही !
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment