स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

समर्पण

समर्पण

धन्य ती जिजाऊ माता
तोड नाही तिच्या धैर्याला
केले समर्पण जीवन
स्वराज्याच्या कार्याला.

धन्य ती सावित्रीबाई
खंबीर असा तिचा बाना
केले समर्पण जीवन
स्त्रियांच्या उंचावल्या माना.

धन्य ती रमाई माऊली
बाबांच्या पाठीशी राहिली
केले समर्पण जीवन
बनली बाबांची सावली.

हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment