वास्तवाचं भान
वास्तवाचं भान ठेवून
मार्गक्रमण करावे
इतिहासाची जाण ठेवून
जीवन आपले सुधारावे.
कल्पनेत न रमावे
वास्तवातच जगावे
कोणीच नाही देणार
तुम्हीच कामी लागावे.
स्वप्न तेच बघावेत
जे वास्तवात येऊ शकते
अवास्तवाच्या मागे लागून
जीवन वाया जावू शकते.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment