गुज
गुज तुझे नी माझे आपण
दोघे वाटून घेऊ
या प्रेमाच्या वाटेवरती
दोघे हुंदळत जावू।
तू तर मजला अशी भासली
रूपाची ती राणी
ऐकत राहावे तुझीच अशी
गोड गोड ती वाणी
गोड गोड वाणीमधून आपण
संगीत शोधत जावू
या प्रेमाच्या वाटेवरती
दोघे हुंदळत जावू।
तुझ्या श्वासात माझाही श्वास
कसा रूतून बसला
दूर करतो म्हटले तर तो
पुन्हा आतच घुसला
एकमेकांना आपण आता
श्वास हा देतच जावू
या प्रेमाच्या वाटेवरती
दोघे हुंदळत जावू।
गुज मनाचे तुझ्या आज
तू बाहेर काढ
भिक मागतो तुझ्या प्रेमाची
थोडी भिक वाढ
प्रेमसागराच्या लाटावरती
दोघे स्वार होवू
या प्रेमाच्या वाटेवरती
दोघे हुंदळत जावू।
*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*
गुज तुझे नी माझे आपण
दोघे वाटून घेऊ
या प्रेमाच्या वाटेवरती
दोघे हुंदळत जावू।
तू तर मजला अशी भासली
रूपाची ती राणी
ऐकत राहावे तुझीच अशी
गोड गोड ती वाणी
गोड गोड वाणीमधून आपण
संगीत शोधत जावू
या प्रेमाच्या वाटेवरती
दोघे हुंदळत जावू।
तुझ्या श्वासात माझाही श्वास
कसा रूतून बसला
दूर करतो म्हटले तर तो
पुन्हा आतच घुसला
एकमेकांना आपण आता
श्वास हा देतच जावू
या प्रेमाच्या वाटेवरती
दोघे हुंदळत जावू।
गुज मनाचे तुझ्या आज
तू बाहेर काढ
भिक मागतो तुझ्या प्रेमाची
थोडी भिक वाढ
प्रेमसागराच्या लाटावरती
दोघे स्वार होवू
या प्रेमाच्या वाटेवरती
दोघे हुंदळत जावू।
*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*
No comments:
Post a Comment