आरक्षण
किती शोषले आम्हाला
आजपर्यंत या सवर्णांनी
याची जाण असू द्यावी.
मगच आरक्षण नको
याची बात करावी.
आरक्षण असतानाही
आमच्या जागा
बळकावल्या जात आहे
मग आरक्षण नसेल तर
आमची स्थिती कशी असेल
याची कल्पना करा.
आपली योग्यता असूनही
खुल्या जागेवर हक्क नाही
आरक्षण मागितले तर म्हणतात
पन्नास टक्केच्यावर देता येत नाही.
पंच्याऐंशी टक्के बहुजनांना
फक्त पन्नास टक्केच राखीव
मग उरलेले पन्नास टक्के कोणासाठी?
कोणी म्हणतात आरक्षणाने
अमक्यांचा फायदा झाला
तर कोणी म्हणतात आरक्षणाने
आमच्यावर अन्याय झाला.
मला सांगा आरक्षणवाल्यांनी
कोणाची जागा बळकावली
आपल्या हक्काची जागा
आपल्या हाती घेतली.
याला तुम्ही जर
अन्याय म्हणत असाल
तर पंधरा टक्क्यांसाठी
उरलेल्या पन्नास टक्के जागा
याला काय म्हणाल ?
आरक्षण ही भीक नाही
तो आपला हक्क आहे
भारतीय संविधानाची
महान अशी देन आहे.
आरक्षणानेच भारतातील
लोकशाही टिकून आहे
अन्यथा आम्हाला केव्हाच
हद्दपार केले असते.
जेथे पहावे तेथे
त्यांचाच भरणा दिसतो
आम्ही मात्र येथे
आरक्षण नको म्हणतो.
आरक्षणाने सांगा
कोणावर अन्याय झाला
आरक्षणाच्या संधीने
समानतेचा योग आला.
आरक्षणाने आता
त्यांना भिती वाटत आहे
आमचा विकास त्यांच्या
डोळ्यात खुपत आहे.
आरक्षणाची ढाल करूनी
करू शिक्षण ही तलवार
अन्यायाला वाचा फोडूनी
उतरवू बदमाशीचा सलवार.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
किती शोषले आम्हाला
आजपर्यंत या सवर्णांनी
याची जाण असू द्यावी.
मगच आरक्षण नको
याची बात करावी.
आरक्षण असतानाही
आमच्या जागा
बळकावल्या जात आहे
मग आरक्षण नसेल तर
आमची स्थिती कशी असेल
याची कल्पना करा.
आपली योग्यता असूनही
खुल्या जागेवर हक्क नाही
आरक्षण मागितले तर म्हणतात
पन्नास टक्केच्यावर देता येत नाही.
पंच्याऐंशी टक्के बहुजनांना
फक्त पन्नास टक्केच राखीव
मग उरलेले पन्नास टक्के कोणासाठी?
कोणी म्हणतात आरक्षणाने
अमक्यांचा फायदा झाला
तर कोणी म्हणतात आरक्षणाने
आमच्यावर अन्याय झाला.
मला सांगा आरक्षणवाल्यांनी
कोणाची जागा बळकावली
आपल्या हक्काची जागा
आपल्या हाती घेतली.
याला तुम्ही जर
अन्याय म्हणत असाल
तर पंधरा टक्क्यांसाठी
उरलेल्या पन्नास टक्के जागा
याला काय म्हणाल ?
आरक्षण ही भीक नाही
तो आपला हक्क आहे
भारतीय संविधानाची
महान अशी देन आहे.
आरक्षणानेच भारतातील
लोकशाही टिकून आहे
अन्यथा आम्हाला केव्हाच
हद्दपार केले असते.
जेथे पहावे तेथे
त्यांचाच भरणा दिसतो
आम्ही मात्र येथे
आरक्षण नको म्हणतो.
आरक्षणाने सांगा
कोणावर अन्याय झाला
आरक्षणाच्या संधीने
समानतेचा योग आला.
आरक्षणाने आता
त्यांना भिती वाटत आहे
आमचा विकास त्यांच्या
डोळ्यात खुपत आहे.
आरक्षणाची ढाल करूनी
करू शिक्षण ही तलवार
अन्यायाला वाचा फोडूनी
उतरवू बदमाशीचा सलवार.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment