*अक्षम्य चूक*
चुका होतील, होत राहतील
चुकणे मानवाचा धर्म आहे
चुकता-चुकता शिकत राहावे
हेच आपले कर्म आहे.
जो चुकतो, त्यातून बोध घेतो
तो पुढे महान होतो
ज्याची छोटी चूक, मोठी होते
तो पुढे लहान होतो.
चुका होतात ज्या नकळत
निस्वार्थ चुका क्षम्य आहेत
जाणून-बुजून केल्या जातात
त्या स्वार्थी चुका अक्षम्य आहेत.
*श्री. हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर
चुका होतील, होत राहतील
चुकणे मानवाचा धर्म आहे
चुकता-चुकता शिकत राहावे
हेच आपले कर्म आहे.
जो चुकतो, त्यातून बोध घेतो
तो पुढे महान होतो
ज्याची छोटी चूक, मोठी होते
तो पुढे लहान होतो.
चुका होतात ज्या नकळत
निस्वार्थ चुका क्षम्य आहेत
जाणून-बुजून केल्या जातात
त्या स्वार्थी चुका अक्षम्य आहेत.
*श्री. हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment