नदिमाय
काय सांगू भाऊ तुले
या नदिमायचे गाऱ्हाणे
पाऊस बसला लपून
म्हणून बंद झाले वाहणे.
पहिले कसा पाऊस
मनसोक्त पडायचा
नदी नाले डबके
सारे काही भरायचा.
आता मात्र पावसाचा
पत्ताच लागत नाही
कोरड्या नदीमायला
पाणीच मिळत नाही.
एक दिवस नदिमाय
रडायलाच लागली
तिच्या कोरड्या डोळयांना
पाण्याची धार लागली.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल जि. नागपूर
सदस्य मराठीचे शिलेदार समुह.
काय सांगू भाऊ तुले
या नदिमायचे गाऱ्हाणे
पाऊस बसला लपून
म्हणून बंद झाले वाहणे.
पहिले कसा पाऊस
मनसोक्त पडायचा
नदी नाले डबके
सारे काही भरायचा.
आता मात्र पावसाचा
पत्ताच लागत नाही
कोरड्या नदीमायला
पाणीच मिळत नाही.
एक दिवस नदिमाय
रडायलाच लागली
तिच्या कोरड्या डोळयांना
पाण्याची धार लागली.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल जि. नागपूर
सदस्य मराठीचे शिलेदार समुह.
No comments:
Post a Comment