स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

प्रारब्ध

*प्रारब्ध*

गोड असावेत आपले शब्द
ना आडवे येईल प्रारब्ध
आत्मविश्वास असा असावा
जग राहिल सारे स्तब्ध.

भूतकाळात काय झाले
याची चिंता नसावी
वर्तमान असे जगावे
भविष्यात खंत नसावी.

जे जे करू आपण
ते योग्य असावे
काय पाप नि काय पुण्य
हे जगाने ठरवावे.

पवित्र असावी भावना
कार्य निस्वार्थ असावे
एके दिवशी प्रारब्ध ही
तुमच्या चरणी झुकावे.

*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*
१८/११/२०१८

No comments:

Post a Comment