हसरं बालपण
बालपण मिळेल का ? -२
बालपणीची खेळणी
बालपणीच्या गोष्टी
पुन्हा पुन्हा घडेल का ?
बालपण मिळेल का ?
बालपणीचे सोबती
बालपणीचा आनंद
पुन्हा पुन्हा भेटेल का ?
बालपण मिळेल का ?
कष्टाचं हे मोठेपण
हसरं हे बालपण
सांगा पुन्हा मिळेल का ?
बालपण मिळेल का ?
बालपणीचं स्वातंत्र्य
बालपणीचं बागडणं
आता पुन्हा होईल का ?
बालपण मिळेल का ?
बालपणी मस्ती किती
नव्हती मनात भीती
भीती आता जाईल का ?
बालपण मिळेल का ?
11.6.2018
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment