स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

समिक्षा

समिक्षा

थोडे शांत बसून
भूतकाळात डोकावले
जीवनाच्या इतिहासाचे
एकेक पान चाळले.
वाटली जीवनाची
थोडी समिक्षा करावी
झाल्या चुका सुधारून
पुढची वाट धरावी.
चुका शोधताना मी
असा गुरफटत गेलो
चुकांच्या डोंगराखाली
मी पुरा दबून गेलो.
केली विनाकारण
जीवनाची समीक्षा
मिळत आहे मनाला
दररोजच शिक्षा.

             हरेशकुमार ना. खैरे
             काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment