हुंकार भीमाचा
हुंकार फुंकला भीमाने
ही माणसे जागी झाली
'शिका' या संदेशाने
ती खूप शिकू लागली.
शिक्षणाने विचार
आता सुधारू लागले
योग्य आणि अयोग्याची
तुलना करू लागले.
'संघटनेचा' भीमाने
मुलमंत्र हा दिला.
हक्क मिळविण्याचा
हा मार्ग रे चांगला.
देईल हरी पलंगावरी
या भ्रमात राहू नका रे
हक्कासाठी आता
चला 'संघर्ष' करा रे.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
हुंकार फुंकला भीमाने
ही माणसे जागी झाली
'शिका' या संदेशाने
ती खूप शिकू लागली.
शिक्षणाने विचार
आता सुधारू लागले
योग्य आणि अयोग्याची
तुलना करू लागले.
'संघटनेचा' भीमाने
मुलमंत्र हा दिला.
हक्क मिळविण्याचा
हा मार्ग रे चांगला.
देईल हरी पलंगावरी
या भ्रमात राहू नका रे
हक्कासाठी आता
चला 'संघर्ष' करा रे.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment