स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

सवय

सवय

सवयींचे प्रकार अनेक असतात
काही चांगल्या काही वाईट
चांगल्या सवयी घट्ट पकडा
वाईट सवयींशी करा फाईट ।

आरोग्याच्या चांगल्या सवयी
आपल्या अंगी बानाव्या
वाईट सवयी आपल्यातल्या
नेहमीच दूर कराव्या ।

सवयी चांगल्या असल्या तर
मान सन्मान मिळतो समाजात
वाईट सवयी असल्या तर
लोक वाईट नजरेने पाहतात ।

वाईट सवयींच्या आहारी
तुम्ही कधीच जावू नका
चांगल्या सवयी तुम्ही पाळा
वाईट सवयींचा ओळखा धोका ।

               हरेशकुमार ना. खैरे
               काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment