काहूर
काहूर उठती मनात
काय माझा गुन्हा
आत्मपरीक्षण स्वतःचे
मी करतो पुन्हा पुन्हा.
रात्रंदिन राबतो मी
या माती दगडात
तरीही मिळेना अन्न
मज पोटभर ताटात.
स्थिती पाहून येते
लज्जा माझ्या मना
घरामध्ये नसतो माझ्या
धान्याचा एकही दाना.
आत्मपरीक्षण स्वतःचे
मी करतो पुन्हा पुन्हा.
मुलांपरी सांभाळतो
मी शेतातल्या पिकाला
पीक करपताना
दुःख येई रे वाट्याला.
कधी पूर महापूर
अवकाळी मोडी कणा
कदर पोशिंद्याची
कधी येईल शासना.
आत्मपरीक्षण स्वतःचे
मी करतो पुन्हा पुन्हा.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
काहूर उठती मनात
काय माझा गुन्हा
आत्मपरीक्षण स्वतःचे
मी करतो पुन्हा पुन्हा.
रात्रंदिन राबतो मी
या माती दगडात
तरीही मिळेना अन्न
मज पोटभर ताटात.
स्थिती पाहून येते
लज्जा माझ्या मना
घरामध्ये नसतो माझ्या
धान्याचा एकही दाना.
आत्मपरीक्षण स्वतःचे
मी करतो पुन्हा पुन्हा.
मुलांपरी सांभाळतो
मी शेतातल्या पिकाला
पीक करपताना
दुःख येई रे वाट्याला.
कधी पूर महापूर
अवकाळी मोडी कणा
कदर पोशिंद्याची
कधी येईल शासना.
आत्मपरीक्षण स्वतःचे
मी करतो पुन्हा पुन्हा.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment