स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

प्रकाशवाटा

*प्रकाशवाटा*

दुःख साराया संसाराचे
बुद्धाने सोडीले घरदार
कठोर परिश्रम करून
शोधली नवी प्रकाशवाट.

शूर वीर तो चक्रवर्ती
होता अशोक सम्राट
पाहून कलेवर तोही द्रवला
धरली बुद्धाची प्रकाशवाट.

होते जगत सारे दलित
जीवन अंधारात
भीमसूर्य घेऊन आला
ती बुद्धाची प्रकाशवाट.

*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*
१७/११/२०१८

No comments:

Post a Comment