स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

प्रकाशवाटा

*प्रकाशवाटा*

शोधा रे नव्या नव्या
या प्रकाशवाटा
जुनाट रूढी परंपरांना
द्या आता फाटा.

हे युग विज्ञानाचे
अंधश्रद्धा सोडा
सत्य असत्य पारखा
ठेवून उघडा डोळा.

नव्या प्रकाशवाटेवर
जातीचे बंधन तोडू
मानवतेला पाळू
माणूस माणूस जोडू.

*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*
१७/११/२०१८

No comments:

Post a Comment