राज्याभिषेक ...
राज्याभिषेकाचा आज दिन उगवला.
सगळीकडे पहा येथे जल्लोष झाला !
आदिलशाही आणि निजामशाही
होत्या सत्ता गाजत महाराष्ट्रात
मुघल बादशाहाच्या त्या डोळ्यात
महाराष्ट्र प्रदेश होता सलत
शिवरायाने स्वराज्याचा निर्धार केला
सगळीकडे पहा येथे जल्लोष झाला !१!
त्रासली होती सगळी जनता
सत्ताधिषांच्या अन्याय अत्याचाराने
जीवन नकोसे वाटू लागले
जुलमी बादशाहांच्या गुलामीने
दुःख हराया तो शिवबा पुढं आला.
सगळीकडे पहा येथे जल्लोष झाला !२!
सभोवती जरी हो शत्रू बलाढ्य
शूर शिवबाने तयांना लोळवले.
शक्ती कमी पण युक्ती मोठी होती
गणिमी काव्याने रणही गाजवले.
शिवबाच्या शौर्याने शत्रूही घाबरला
सगळीकडे पहा येथे जल्लोष झाला !३!
महत्प्रयासाने येथे स्वराज्य आले
गुलामीतून सारे बंधमुक्त झाले.
दुःखी जनतेला सुख प्राप्त झाले
जिजाऊ शिवबाचे उपकार झाले
शिवबा जनतेचा तारणहार झाला.
सगळीकडे पहा येथे जल्लोष झाला !४!
कळावे स्वराज्य समस्त जगाला
म्हणून आखली राज्याभिषेक योजना.
राजे महाराजे आले पाहण्या सोहळा
रायगडही सजला जिजाऊची प्रेरणा.
सिंहासनी शिवबा तो छत्रपती झाला.
सगळीकडे पहा येथे जल्लोष झाला !५!
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
राज्याभिषेकाचा आज दिन उगवला.
सगळीकडे पहा येथे जल्लोष झाला !
आदिलशाही आणि निजामशाही
होत्या सत्ता गाजत महाराष्ट्रात
मुघल बादशाहाच्या त्या डोळ्यात
महाराष्ट्र प्रदेश होता सलत
शिवरायाने स्वराज्याचा निर्धार केला
सगळीकडे पहा येथे जल्लोष झाला !१!
त्रासली होती सगळी जनता
सत्ताधिषांच्या अन्याय अत्याचाराने
जीवन नकोसे वाटू लागले
जुलमी बादशाहांच्या गुलामीने
दुःख हराया तो शिवबा पुढं आला.
सगळीकडे पहा येथे जल्लोष झाला !२!
सभोवती जरी हो शत्रू बलाढ्य
शूर शिवबाने तयांना लोळवले.
शक्ती कमी पण युक्ती मोठी होती
गणिमी काव्याने रणही गाजवले.
शिवबाच्या शौर्याने शत्रूही घाबरला
सगळीकडे पहा येथे जल्लोष झाला !३!
महत्प्रयासाने येथे स्वराज्य आले
गुलामीतून सारे बंधमुक्त झाले.
दुःखी जनतेला सुख प्राप्त झाले
जिजाऊ शिवबाचे उपकार झाले
शिवबा जनतेचा तारणहार झाला.
सगळीकडे पहा येथे जल्लोष झाला !४!
कळावे स्वराज्य समस्त जगाला
म्हणून आखली राज्याभिषेक योजना.
राजे महाराजे आले पाहण्या सोहळा
रायगडही सजला जिजाऊची प्रेरणा.
सिंहासनी शिवबा तो छत्रपती झाला.
सगळीकडे पहा येथे जल्लोष झाला !५!
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment