अनाथ मी...
का तू सोडून गेलीस ?
अशी मंदिराच्या दारी
आज अनाथ मी झाली
माझा सांभाळ कोण करी ।
मी तुझ्या पोटात आली
तेव्हा किती खुश झाली
तुझ्या पोटात खेळताना
मला लई मजा आली.
या जगात आल्यावर
का झाली तुजला भारी
आज अनाथ मी झाली
माझा सांभाळ कोण करी ।
काय तुजला छळले ?
मुलगा हवा म्हणून
काय मिळाले बाबांना ?
मुलगा मुलगा करून.
तू पण गेलीस दूरी
ही सोडून तुझी परी
आज अनाथ मी झाली
माझा सांभाळ कोण करी ।
19.6.2018
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
का तू सोडून गेलीस ?
अशी मंदिराच्या दारी
आज अनाथ मी झाली
माझा सांभाळ कोण करी ।
मी तुझ्या पोटात आली
तेव्हा किती खुश झाली
तुझ्या पोटात खेळताना
मला लई मजा आली.
या जगात आल्यावर
का झाली तुजला भारी
आज अनाथ मी झाली
माझा सांभाळ कोण करी ।
काय तुजला छळले ?
मुलगा हवा म्हणून
काय मिळाले बाबांना ?
मुलगा मुलगा करून.
तू पण गेलीस दूरी
ही सोडून तुझी परी
आज अनाथ मी झाली
माझा सांभाळ कोण करी ।
19.6.2018
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment