स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

पाऊलवाट

पाऊलवाट

युद्ध नको शांती हवी
असाच जयांचा थाट
शांतीदूत गौतमाची
हिच ती पाऊलवाट.

जिंकले जरी ते युद्ध
मनास बसली चोट
अशोकाने गौतमाची
धरली पाऊलवाट.

जेथे केला त्याचा छळ
सोडली त्याने ती वाट
बा भीमाने गौतमाची
धरली पाऊलवाट.

हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
सदस्य मराठीचे शिलेदार समुह.

No comments:

Post a Comment