स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

घटनाकार

*घटनाकार*

भीमराव घटनाकार
घटनेचा शिल्पकार !

घटना तयार करणे
मसुदा समितीचे काम
होते सात सदस्यात
अध्यक्षस्थानी भीम
भीमरावाला सोडून
झाले सारे पसार
भीमराव घटनाकार
घटनेचा शिल्पकार !

जरी पडला भीम एकटा
ना झुकला बहादुर पठ्ठा
घटनेची जबाबदारी
उचलली आपल्या शिरी
लिहिली घटना सुंदर
त्या बुद्धीच्या जोरावर
भीमराव घटनाकार
घटनेचा शिल्पकार !

ऐतिहासिक ठरली
भीमरावाची घटना
सारे एकत्र गुंफले
केली सुंदर रचना
घटना लिहून भीमाने
केले आम्हावर उपकार
भीमराव घटनाकार
घटनेचा शिल्पकार !

घटना लिहिताना
येथे अनेक वाद झाले
त्याने प्रत्येक प्रश्नाला
रोखठोक उत्तर दिले
भीमरावाच्या वक्तृत्वाने
फिके पंडीत सरदार
भीमराव घटनाकार
घटनेचा शिल्पकार !

भारत देशात जनता
विखुरली जातीपातीत
घटना लिहून भीमाने
जात गाडली मातीत
घटनेतून निघाला
न्याय समतेचा अंकुर
भीमराव घटनाकार
घटनेचा शिल्पकार !

*दि. १८ ऑक्टोबर २०१८*
*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*

No comments:

Post a Comment