स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

उरल्या त्या आठवणी

उरल्या त्या आठवणी

बालपण हे उरले नाही
ही एकच खंत मनी
उरल्या त्या आठवणी रे
फक्त उरल्या त्या आठवणी !

बालपणात हसत खेळत
मिळे खूप आनंद
उडू बागडू इकडे तिकडे
मनसोक्त स्वच्छंद
आज असे घडत नाही
ही एकच खंत मनी
उरल्या त्या आठवणी रे
फक्त उरल्या त्या आठवणी !

बालपणीचे दोस्तही खूप
खेळ खेळती मजेचे
झगडा भांडण झाले तरीही
रूसवे फुगवे फुटायचे
पुन्हा जाता येईल का रे
आपल्या त्या बालपणी
उरल्या त्या आठवणी रे
फक्त उरल्या त्या आठवणी !

बालपणी तर आई-बाबांचे
आपण राजा, राणी
काय हवे ते लगेच मिळे
आपण मागताक्षणी
पुन्हा खेळता येईल का रे
आपल्या जुन्या खेळणी
उरल्या त्या आठवणी रे
फक्त उरल्या त्या आठवणी !

                हरेशकुमार ना. खैरे
                काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment