स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

स्वार्थ हा स्वत:चा

स्वार्थ हा स्वत:चा

स्वार्थ हा स्वत:चा ! नाही रे कामाचा !
विचार दुजाचा ! कर आधी !!

स्वार्थ हा स्वत:चा ! ना देई आनंद !
विचार स्वार्थाचा ! दुःख देई !!

स्वार्थापायी पहा ! किती रे बुडाले !
नाही रे तरले ! जीवनात !!

स्वार्थ मोह माया ! जीवन हे वाया !
कोण देई छाया ! माणसाला !!

स्वार्थी जीवनात ! सदा मान खाली !
कोणाची रे आली ! सांगा वर !!

स्वार्थाने जे वेडे ! त्याला न रे कळे !
जीवन सगळे ! कोणासाठी !!

                        हरेशकुमार ना. खैरे
                        काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment