जन्मोत्सव
आम्ही करतो साजरे
आमचे जन्मोत्सव
एखाद्या नदीच्या काठावर
आणि आम्हीच डुबूनही मरतो
पण कधीतरी साजरा करा
आपला जन्मोत्सव
एखाद्या झोपडपट्टीत
आणि घेवू द्या आनंद
या गरिबांनाही.
किती उधळतो पैसा
आम्ही जन्मोत्सवाच्या नावाने
बँड बाजा आणि
नाच गाण्यावर
मीही कमी नाही
या बाण्यावर.
अशा खोट्या आनंदापेक्षा
कधीतरी मदत करा
एखाद्या गरजूला
उपकार होतील तुमचे
आणि अर्थ येईल
तुमच्या जगण्याला.
जन्मोत्सवाचा खर्च
किती वाया घालवतो
एकाच दिवसासाठी
थोड्याशा आनंदासाठी.
त्यापेक्षा शोधूया एखादा शेतकरी
कर्जात बुडालेला
आणि करू त्याला मदत
त्याचा म्रुत्यु रोखण्यासाठी.
आपल्या जन्मोत्सवाचा
आनंद दान देऊन
एखाद्याला जीवनदान
देता येत असेल
तर त्यापेक्षा मोठा आनंद
कोणता असू शकतो ?
दि.6.6.2018
श्री. हरेशकुमार ना. खैरे
काटोल,जि. नागपूर
आम्ही करतो साजरे
आमचे जन्मोत्सव
एखाद्या नदीच्या काठावर
आणि आम्हीच डुबूनही मरतो
पण कधीतरी साजरा करा
आपला जन्मोत्सव
एखाद्या झोपडपट्टीत
आणि घेवू द्या आनंद
या गरिबांनाही.
किती उधळतो पैसा
आम्ही जन्मोत्सवाच्या नावाने
बँड बाजा आणि
नाच गाण्यावर
मीही कमी नाही
या बाण्यावर.
अशा खोट्या आनंदापेक्षा
कधीतरी मदत करा
एखाद्या गरजूला
उपकार होतील तुमचे
आणि अर्थ येईल
तुमच्या जगण्याला.
जन्मोत्सवाचा खर्च
किती वाया घालवतो
एकाच दिवसासाठी
थोड्याशा आनंदासाठी.
त्यापेक्षा शोधूया एखादा शेतकरी
कर्जात बुडालेला
आणि करू त्याला मदत
त्याचा म्रुत्यु रोखण्यासाठी.
आपल्या जन्मोत्सवाचा
आनंद दान देऊन
एखाद्याला जीवनदान
देता येत असेल
तर त्यापेक्षा मोठा आनंद
कोणता असू शकतो ?
दि.6.6.2018
श्री. हरेशकुमार ना. खैरे
काटोल,जि. नागपूर
No comments:
Post a Comment