आमची जि. प. ची शाळा
आमची जि. प. ची शाळा
आहे किती किती जुनी
गिरविले धडे येथे
आम्ही लहानपणी.
आमची जि. प. ची शाळा
आजही मला आठवते
या जीवनाचा धडा
कसा छान पटवते.
आमची जि. प. ची शाळा
कित्येक शिकले येथे
जीवनात यशस्वी होवून
माथा टेकतात येथे.
आमची जि. प. ची शाळा
आता खूप बदल झाले
शिक्षकांचं सोडा येथे
मुलेच बोलू लागले.
आमची जि. प. ची शाळा
येथे अनेक योजना राबवतात
सर्वांगीण विकास करून
मुलगा चौफेर घडवतात.
आमची जि. प. ची शाळा
येथे उपक्रम किती
मुलांच्या मनात आता
नाही गुरुजींची भीती.
आमची जि. प. ची शाळा
तिला समाजाचे भान
कार्य आणि उपक्रमातून
वाढवते गावाची शान.
आमची जि. प. ची शाळा
येथे जे शिकतात
जीवनाच्या शर्यतीत
तेच पुढे टिकतात.
आमची जि. प. ची शाळा
येथे सारेच गुण भेटतात
गुण म्हणजे मार्क नाही
ते सर्वांगाने नटतात.
आमची जि. प. ची शाळा
तिला झोलबा पाटलाचा वाडा म्हणतात
ही गंमत असली तरी
मोठमोठ्या शाळा तिला सलाम करतात.
10.6.2018
*श्री. हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल,जि. नागपूर*
आमची जि. प. ची शाळा
आहे किती किती जुनी
गिरविले धडे येथे
आम्ही लहानपणी.
आमची जि. प. ची शाळा
आजही मला आठवते
या जीवनाचा धडा
कसा छान पटवते.
आमची जि. प. ची शाळा
कित्येक शिकले येथे
जीवनात यशस्वी होवून
माथा टेकतात येथे.
आमची जि. प. ची शाळा
आता खूप बदल झाले
शिक्षकांचं सोडा येथे
मुलेच बोलू लागले.
आमची जि. प. ची शाळा
येथे अनेक योजना राबवतात
सर्वांगीण विकास करून
मुलगा चौफेर घडवतात.
आमची जि. प. ची शाळा
येथे उपक्रम किती
मुलांच्या मनात आता
नाही गुरुजींची भीती.
आमची जि. प. ची शाळा
तिला समाजाचे भान
कार्य आणि उपक्रमातून
वाढवते गावाची शान.
आमची जि. प. ची शाळा
येथे जे शिकतात
जीवनाच्या शर्यतीत
तेच पुढे टिकतात.
आमची जि. प. ची शाळा
येथे सारेच गुण भेटतात
गुण म्हणजे मार्क नाही
ते सर्वांगाने नटतात.
आमची जि. प. ची शाळा
तिला झोलबा पाटलाचा वाडा म्हणतात
ही गंमत असली तरी
मोठमोठ्या शाळा तिला सलाम करतात.
10.6.2018
*श्री. हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल,जि. नागपूर*
No comments:
Post a Comment