स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

रेशमी धुके

रेशमी धुके

रेशमी धुक्याने
अंग शहारले
तुझ्या भेटीसाठी
मन आतुरले.

या दवबिंदूंचा
हा सडा पडला
पहा पानावर
मोती चमकला.

ही हिरवी साडी
धरेने नेसली
साडीची किनार
धुक्याने सजली.

या रम्य सकाळी
धुक्याची ही गर्दी
धुक्याचा असर
पहा झाली सर्दी.

रेशमी धुक्याचा
अनुभव घेवू
पलिकडे काही
 दिसते का पाहू.

        हरेशकुमार ना. खैरे
        काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment