स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

वीरांगणा

वीरांगणा

वीरांगना ठरली ती जिजाऊ माता
घडविला तिने येथे शिवराय बेटा ।
शिवरायांच्या पराक्रमाने हा महाराष्ट्र
मराठमोळ्या लोकांचे ठरले राज्य श्रेष्ठ

विरांगना ठरली येथे सावित्रीबाई फुले
मुली येथे शिकत नव्हत्या शिकायची फक्त मुले
शिक्षणाच्या रणांगणात उतरल्या सावित्रीबाई
मुली येथे शिकू लागल्या ही सावित्रीची पुण्याई.

विरांगना ठरली भीमाई नि रमाई
भीमाईनं दिला जन्म रमाईनं साथ
समाजाच्या रणांगणात ज्यांना नव्हता मान
मिळवून दिला भीमाने जगण्याचा सन्मान.

                          हरेशकुमार ना. खैरे
                          काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment