अधुरं स्वप्न
मी स्वप्न पाहिलं होतं
खूप खूप शिकायचं
शिकून मोठ्यापणी
डॉक्टर इंजिनिअर व्हायचं.
मी खूप हुशार होतो
पहिलाच नंबर घ्यायचो
सर्वच उपक्रमात मी
पुढेपुढेच असायचो.
हुशार हुशार म्हणून सारे
माझं कौतुक करायचे
कौतुकाच्या शब्दांनी
माझे मन भरायचे.
आम्ही होतो गरीब
पोट कसं भरायचो
शिकता शिकता मीही
काही काम करायचो.
पुढारलेले लोक मदत
करतील असे वाटायचे
मदतीला हात पसरता
हळूच रस्ता काटायचे.
प्रश्न पडला पैसा नाही
प्रवेश कसा मिळवायचा
पाहिलेल्या स्वप्नांचा
पाठलाग कसा करायचा.
तडजोड नाही पैशाची
स्वप्न आता सोडायचे
गरीबांची गत अशी
पैशाविना अडायचे.
विचार मनात केला
माग नाही हटायचा
ठेवून अधूरं स्वप्न
मार्ग दुसरा धरायचा.
आता कधी कोणापुढेही
हात नाही पसरायचा
कष्ट आणि प्रामाणिकता
हाच मार्ग निवडायचा.
जरी ना झालो इंजिनिअर
ना पेशा माझा डॉक्टरचा
मनात आहे समाधान
मी घास खातो सुखाचा.
शोधात आहो मी त्याच्या
ज्याला हवा हात मदतीचा
माझं अधुरं स्वप्न
मार्ग त्याच्या प्रगतीचा.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
मी स्वप्न पाहिलं होतं
खूप खूप शिकायचं
शिकून मोठ्यापणी
डॉक्टर इंजिनिअर व्हायचं.
मी खूप हुशार होतो
पहिलाच नंबर घ्यायचो
सर्वच उपक्रमात मी
पुढेपुढेच असायचो.
हुशार हुशार म्हणून सारे
माझं कौतुक करायचे
कौतुकाच्या शब्दांनी
माझे मन भरायचे.
आम्ही होतो गरीब
पोट कसं भरायचो
शिकता शिकता मीही
काही काम करायचो.
पुढारलेले लोक मदत
करतील असे वाटायचे
मदतीला हात पसरता
हळूच रस्ता काटायचे.
प्रश्न पडला पैसा नाही
प्रवेश कसा मिळवायचा
पाहिलेल्या स्वप्नांचा
पाठलाग कसा करायचा.
तडजोड नाही पैशाची
स्वप्न आता सोडायचे
गरीबांची गत अशी
पैशाविना अडायचे.
विचार मनात केला
माग नाही हटायचा
ठेवून अधूरं स्वप्न
मार्ग दुसरा धरायचा.
आता कधी कोणापुढेही
हात नाही पसरायचा
कष्ट आणि प्रामाणिकता
हाच मार्ग निवडायचा.
जरी ना झालो इंजिनिअर
ना पेशा माझा डॉक्टरचा
मनात आहे समाधान
मी घास खातो सुखाचा.
शोधात आहो मी त्याच्या
ज्याला हवा हात मदतीचा
माझं अधुरं स्वप्न
मार्ग त्याच्या प्रगतीचा.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment