स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

सत्य विसरून गेले

सत्य विसरून गेले

या माणसांत त्यांनी
का भेदभाव केले
माणूस ही एकच जात
हे सत्य विसरून गेले.

आम्ही माणूस होतो
तेही माणसेच होती
एक जात श्रेष्ठ होती
दुसरी कनिष्ठ होती
माणसात हा भेदभाव
करणे नाही चांगले
माणूस ही एकच जात
हे सत्य विसरून गेले.

जाती धर्माच्या नावाने
येथे होतात दंगली
माणसातील एकता
सांगा कशी भंगली
जाती धर्म विसरून
एक होणे चांगले
माणूस ही एकच जात
हे सत्य विसरून गेले.

देवाच्या नावाने येथे
माणसे तोडतात
माणुसकीची येथे
ते धिंड काढतात
मानवतेची पुजा
करणे आहे चांगले
माणूस ही एकच जात
हे सत्य विसरून गेले.

               हरेशकुमार ना. खैरे
               काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment