स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

अपराधी

अपराधी

अपराध करून जो ठरला अपराधी
पकडून त्याला आता शिक्षा करा आधी |

जोवर असे कडक पाऊल उचलणार नाही
अपराध्याला कायद्याची भिती वाटणार नाही
कायदा करा असा राहिल धाक मनामधी
पकडून त्याला आता …..

अपराधी बघा कसे मोकाट फिरतात
करूनही गुन्हे त्यांना मिळे जमानत
अपराध करून झाले निडर अपराधी
पकडून त्याला आता …..

गुंडागर्दी चोऱ्यामाऱ्या रोज घडतात
विनयभंग बलात्कार रोज करतात
गोष्टी या गंभीर आता थांबणार कधी
पकडून त्याला आता …..

                     23.05.2018
                     हरेशकुमार ना. खैरे
                     काटोल,  जि. नागपूर

No comments:

Post a Comment