स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

असे करून पहावे...

असे करून पहावे...

असे करून पहावे
सान थोड्यांना मदत
जरा देऊन पहावे
मुक्या गुरांना गवत.

असे करून पहावे
आपल्या बाजूने चालावे
लवकर उठून पहावे
पाणी रोपांना घालावे.

असे करून पहावे
रोज अभ्यास करावे
पाणी वाचवून पहावे
अंगण स्वच्छ करावे.

असे करून पहावे
आदर मोठ्यांना द्यावे
बोट धरून छोट्यांचे
आपल्या सोबत न्यावे.

हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment