गुंतागुंत ही मनाची
गुंतागुंत ही मनाची, सांगा कशी सोडवावी ।
वादळे ही मनातील, सांगा कशी थोपवावी ।
मन चंचल पाखरू, त्याला कसे पकडावे ।
थोडे येथे थोडे तेथे, त्याला कसे सावरावे ।
घालमेल ही मनाची, दूर कशी ती करावी ।
वादळे ही मनातील, सांगा कशी थोपवावी ।
मनात नाना विचार, योग्य कसा निवडावा ।
नाही ताबा मनावर, मार्ग कोणता धरावा ।
इच्छा आपल्या मनाची, पूर्ण कशी ती करावी ।
वादळे ही मनातील, सांगा कशी थोपवावी ।
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
गुंतागुंत ही मनाची, सांगा कशी सोडवावी ।
वादळे ही मनातील, सांगा कशी थोपवावी ।
मन चंचल पाखरू, त्याला कसे पकडावे ।
थोडे येथे थोडे तेथे, त्याला कसे सावरावे ।
घालमेल ही मनाची, दूर कशी ती करावी ।
वादळे ही मनातील, सांगा कशी थोपवावी ।
मनात नाना विचार, योग्य कसा निवडावा ।
नाही ताबा मनावर, मार्ग कोणता धरावा ।
इच्छा आपल्या मनाची, पूर्ण कशी ती करावी ।
वादळे ही मनातील, सांगा कशी थोपवावी ।
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment