प्रेमांगण
तुझे नि माझे प्रेम
येथेच फुलून आले
आपल्या या जीवनाचे
हे प्रेमांगण ठरले ।
येथेच आपली भेट
नित्य होत होती
प्रिती ही आपली
येथेच बहरत होती
आपल्या या जीवनात
हे नंदनवन ठरले
आपल्या या जीवनाचे
हे प्रेमांगण ठरले ।
एकमेकांचे विचार
येथेच जुळले होते
एकमेकांचे हे मन
येथेच कळले होते
आयुष्याचे गणित
आपण येथेच मांडले
आपल्या या जीवनाचे
हे प्रेमांगण ठरले ।
प्रेमांगणाची आठवण
ही सदैव येत राहील
आपल्या पवित्र प्रेमाची
हा साक्ष देत राहील
आपल्या प्रेमाचे तर
हेच स्मारक ठरले
आपल्या या जीवनाचे
हे प्रेमांगण ठरले ।
*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*
तुझे नि माझे प्रेम
येथेच फुलून आले
आपल्या या जीवनाचे
हे प्रेमांगण ठरले ।
येथेच आपली भेट
नित्य होत होती
प्रिती ही आपली
येथेच बहरत होती
आपल्या या जीवनात
हे नंदनवन ठरले
आपल्या या जीवनाचे
हे प्रेमांगण ठरले ।
एकमेकांचे विचार
येथेच जुळले होते
एकमेकांचे हे मन
येथेच कळले होते
आयुष्याचे गणित
आपण येथेच मांडले
आपल्या या जीवनाचे
हे प्रेमांगण ठरले ।
प्रेमांगणाची आठवण
ही सदैव येत राहील
आपल्या पवित्र प्रेमाची
हा साक्ष देत राहील
आपल्या प्रेमाचे तर
हेच स्मारक ठरले
आपल्या या जीवनाचे
हे प्रेमांगण ठरले ।
*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*
No comments:
Post a Comment