स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

उरल्या त्या आठवणी

उरल्या त्या आठवणी

पूर्वी खेड्यात असताना
खूप मजा यायची
रान शिवार हिंडताना
नदीही दिसायची
लहान लहान मुले
गल्लीबोळात खेळायची
मोठे बुजुर्ग पारावर
गप्पा मारत बसायची
माणसे असली जरी
घराच्या शेजारची
मला मात्र नेहमी
घरचीच वाटायची
आज आलो शहरात
त्या गोष्टी दिसत नाही
खेड्यातली मजा
शहरात काही मिळत नाही
हे शहरी जीवन
नाही खेड्यावाणी
आता मात्र खेड्याच्या
त्या उरल्या आठवणी.

                  हरेशकुमार ना. खैरे
                  काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment