स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

गवतफुला

गवतफुला

जाणून घ्या हो तुम्ही
गवतफुलांची व्यथा
गवतफुलांची तुम्हाला
ऐका सांगतो कथा.

रानोमाळी हिंडताना
ही सुंदर फुले पाहताना
वाऱ्यावरती डोलताना
फुलपाखरांशी खेळताना
भरली गवतफुलांची
डोळ्यामध्ये सुंदरता
गवतफुलांची तुम्हाला
ऐका सांगतो कथा.

फुले  गवतफुलांची
आहेत बहुगुणी
मुळे यांची भरलेली
आहे हो औषधांनी
विविध या रोगांवर
याची हो आवश्यकता
गवतफुलांची तुम्हाला
ऐका सांगतो कथा.

असले जरी रानटी
कोठेही उगवते
पायवाटेने चालताना
पायाशी हे लोळते
मनात हे दुःख सलते
का तयाला टाळता
गवतफुलांची तुम्हाला
ऐका सांगतो कथा.

            हरेशकुमार ना. खैरे
            काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment