स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

वर्षारंभ

वर्षारंभ

या वर्षारंभाचे
आज स्वागत आहे
येथे आता साऱ्यांना
त्याचीच आस आहे.

या नविन वर्षात
मिळावे आम्हा काही
आम्हा येथे कुणीच
आधार देत नाही.

हे नविन वर्षा तू
ये गरीबांचा वाली होऊन
अमिर गरीबीची दरी
टाक कमी करून.

ये नववर्षा ये तू
सुखाची ढगे घेऊन
आनंदाच्या सरीत
जाऊ दे दुःख वाहून.

ये नववर्षा ये आज
घेऊन प्रेमाचा पिटारा
शत्रुही घेईल धसका
पाहून तुझा दरारा.

             :-  हरेशकुमार ना. खैरे
                 काटोल, जि. नागपूर
                 दि. १/१/२०१९*

No comments:

Post a Comment