स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

दुपारची सावली

*दुपारची सावली*

ही दुपारची सावली
कशी पायात लोळते
छोटी छोटी होऊनिया
पहा पायात घुसते.

ही सकाळच्या उन्हात
लांबलचकच पडते
उन्ह वाढता वाढता
पायाखाली विसावते.

सकाळी नि संध्याकाळी
ही फिरते भोवताल
शोधी दुपारी आसरा
ही पायाच्या खालोखाल.

शोधताना सावलीला
पुरे आपण थकतो
थकून भागून सारे
तिच्यावरच बसतो.

*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*
*दि. २८/११/२०१८*

No comments:

Post a Comment