स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

खरी सोबत…..

खरी सोबत…..

तुझ्या माझ्या संसाराचा
गाडा पुढे नेऊ
जीवनाच्या रथामध्ये
दोघे स्वार होऊ
रथ आपुला रे असा
वेगाने चालवू
सुख दुःख वेचूनिया
जीवन फुलवू
खरी सोबत
साथ देवून
बाग जीवनाची
येई फुलून

जीवनाच्या वाटेवर
पसरले काटे
काट्यातून चालताना
काळीज हे फाटे
रक्ताळले पाय
करू जीवनाचे काय
प्रश्नांनी या अशा
जीव हळू हळू तुटे
दुःख विसरून पाहू
सुखाची ही वाट
काळोखाच्या पलिकडे
सोनेरी पहाट
खरी सोबत
साथ देवून
बाग जीवनाची
येई फुलून

एकमेकाला रे देवू
आज जगण्याची आस
कटू अनुभव आले
तरी होवू ना निराश
खचले जरी मन
दोघेही सावरू
मनाच्या या गोंधळाला
दोघेही आवरू
ठेवू मनावर ताबा
ना होवू रे  कठोर
दुःखाच्या या पलिकडे
सुखाचं कटोरं
खरी सोबत
साथ देवून
बाग जीवनाची
येई फुलून

दि. 19.05.2018
*श्री. हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*

No comments:

Post a Comment