स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

अविश्वासी

अविश्वासी

किती वाट मी पाहते
लई आतूर मिलनाशी
आस दावूनी मजला
का करतो अविश्वासी ।

या निरभ्र आकाशात
जेव्हा काळे दाटून येई
मनमोहिनी माझी नाचे
आनंदाने थुई थुई ।

बघ माझे हे शरीर
कसे  गेले फाटून
ये सरसर धाऊन
आणि टाक सांधून ।

मजला आस तुझी
तू मजला तारशी
तहान माझी भागव
करू नको अविश्वासी ।

*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*

No comments:

Post a Comment