स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

स्वयंभू

स्वयंभू

स्वयंभू बनावे शिवबापरी
हातात तलवार घेवून
सदैव तत्पर असावे
जावे जनकल्याणा धावून.

स्वयंभू असावी नारीजात
घेवून सावित्रीचा वसा
सिद्ध करूनी स्वकर्तुत्व
उमटू द्या कार्याचा ठसा.

स्वयंभू तो सिद्धार्थ गौतम
सोडला सारा राजदरबार
जनकल्याणाचे स्वप्न घेवूनी
त्यागिला सुखी संसार.

स्वयंभू ते फुले ज्योतिबा
अन् स्वयंभू ते छत्रपती शाहू
दिले शिक्षण अन् आरक्षण
सदा त्यांच्या उपकारात राहू.

स्वयंभू तो हिरा निपजला
येथे बाबा भीमराव
घटनेचा तो शिल्पकार
जरी येथे सवर्णांचा घेराव.

*हरेशकुमार ना.खैरे*
*काटोल, जि. नागपूर*

No comments:

Post a Comment